Pune News : पुणे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या गुंड अजय मौजण विरुद्ध एमपीडीए कारवाई….


Pune News : पुणे ग्रामीणसह पुणे शहर आयुक्तालयातील हडपसर हद्दीत गुन्हेगारी कृत्याने धुमाकूळ घालणाऱ्या अजय मौजण या गुंडाविरुद्ध एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

रांजणगाव एमआयडीसी व हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकु, लोखंडी कोयता यासारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह दुखापतीसह जबरी चोरी, जबरी चोरी, चोरी, घराविषयी आगळीक, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अजय युसुफ मौजण, (वय १९ वर्षे, रा. पाचुंदकर वस्ती, देवाची वाडी, रांजणगाव गणपती, रांजणगाव, ता. शिरूर जि. पुणे विरुद्ध मागील ५ वर्षामध्ये त्याचे विरूध्द ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. Pune News

तसेच त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. गुन्हेगाराच्या कारवाया थांबत नसल्याने हडपसरचे वपोनि रवींद्र शेळके यांनी गुंड अजय मौजण विरुद्ध एमपीडीए कारवाई प्रयत्न केले.

दरम्यान, प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार यांनी मौजण विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!