Pune News : धक्कादायक! नायगाव येथे विवाहितेने केली आत्महत्या, गळफास घेऊन संपवल आयुष्य, नेमकं काय घडलं?

Pune News लोणी काळभोर : एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना नायगाव (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. २७) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
अनिता राहुल रुपनवर उर्फ अनिता प्रकाश शिंदे (वय ३८, सध्या रा. नायगाव, ता. हवेली, मुळ रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेने नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता या विवाहित असून, मागील काही दिवसांपासून नायगाव येथे राहत होत्याअनिताने बुधवारी (ता.२७) रात्री साडेदहा वाजण्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. Pune News
त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविला आहे. अनिताने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. लोणी काळभोर पोलीस त्यादृष्टीने पुढील तपास करत आहेत.