Pune : सिंहगडावर नववर्षाचे सेलिब्रेशन, हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी दाखवला हिंसका, ‘एवढा’ दंड केला वसूल ..

Pune पुणे : थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी घेलेल्या पर्यटकांवर वनविभागाने कारवाई केली आहे. नियमाचे भंग केलेल्यांना वनविभागाने खाक्या दाखवला आणि त्यांच्याकडून अडीच हजार रुपये दंडही वसूल केल्याची माहिती आहे.
सिंहगडावर ३१ डिसेंबरला म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांनी गर्दी केली तसेच सहा हजारांहून अधिक लोकांनी गडाला भेट दिली. यामध्ये दारू आणि इतर प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करणाऱ्या पाच चारचाकी वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून प्रत्येक वाहनाकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. Pune
तसेच यावेळी गडावर ३१ डिसेंबरला गर्दी होऊन वाहतूक कोंडीही झाली. या गडावर येणार्यांमध्ये तळीरामांचाही समावेश होता. एकूणच या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजे शिवराय प्रतिष्ठानच्या मदतीने प्रत्येक वाहनाची तपासणी केली.
यावेळी त्यात पाच वाहनांमधून दारू, सिगारेट, तंबाखू आदी वस्तू जप्त केल्या असून, त्यांच्याकडून अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सिंहगड किल्ल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी दिली आहे.