पुणे बाजार समितीच्या यशवंतच्या जमिन खरेदीच्या प्रस्तावात त्रुटी! त्रुटींचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर मंजुरीच्या प्रतिक्षेत…

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने थेऊर येथील यशंवत सहकारी साखर कारखान्याची सुमारे ९९.२७ एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव पणन संचालकांना पाठविला आहे. मात्र या प्रस्तावात कारखान्याचा वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी, जमिन विक्रीची विहीत किंमत तसेच तालुक्यात इतर खरेदी प्रस्तावाची कार्यवाही आदी त्रुटींची स्कुटनी पणन संचालयाने काढली असून बाजार समितीचे सचिव यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
पुणे बाजार समितीने गेल्या १२ वर्षापासून भागभांडवल अभावी बंद अवस्थेत असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता असलेली ९९.२७ जमिन उपबाजार खरेदी करण्यासाठी उत्सुक असून या बाजार समितीच्या संचालक मंडळाने जमिन खरेदीची संमती दिली आहे.
त्यानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील कलम 12(1) अन्वये पुणे बाजार समितीने जमीन खरेदीचा प्रस्ताव पणन संचालनालयाकडे पाठविला आहे. तसेच हा प्रस्ताव शासन मंजुरीसाठी पणनने मंत्रालय स्तरावरही पाठविला आहे. मात्र या प्रस्तावात त्रुटी असल्याने पणन संचालयाने पुणे समितीचे सचिव यांना त्रुटीची पूर्तता करण्यासाठी पत्र पाठविले आहे.
दरम्यान, या प्रस्तावात जमिन विक्रीचा ठरावास सर्वसाधारण सभा मंजुरी, जमिनीचा दर तसेच बाजार समितीने यापूर्वी उपबाजार म्हणून साष्ठे सुरू केलेली कार्यवाही तसेच इतर मुद्द्यांवर शासन स्तरावरून त्रुटी काढण्यात आल्या. त्याची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे. त्यावर शासनास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करता येत नाही. तरी काही मुद्द्यांवर बाजार समितीने सविस्तर माहिती दिल्यास शासनास स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह सादर करता येईल, अशी माहिती पणन संचालनालयातून देण्यात आली आहे.