Pune Koyata Gang : कायद्याचा धाक संपला? पुण्यात कोयता गँगचा पोलिसांसमोरच हल्ला..

Pune Koyata Gang पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
मात्र, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पुण्यात भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोरच दोन गटांमध्ये कोयता हल्ला झाल्याची घटना वडगावशेरी या परिसरात घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका गटाकडून दुसऱ्या गटावर खुनी हल्ला करण्यात आला आहे.या हल्ल्यात दोन ते तीन तरूण गंभीर जखमी झाले असून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. Pune Koyata Gang
धक्कादायक बाब म्हणजे हल्ला झाला त्यावेळी महिला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. पोलिसांना न जुमनता कोयता गँगने हल्ला केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.