Pune : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद!! चिमुड्यावर हल्ला, खाली पाडून लचके तोडले….


Pune : पुण्यातील चाकण परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चाकणजवळील कडाचीवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यामध्ये चिमुकला मुलगा रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. मात्र, कुत्रे समोर दिसताच हा चिमुकला थांबला. प्रथम एक कुत्रा लांबून त्याच्या अंगावर भुंकला तेव्हा या चिमुकल्याने घाबरुन, ‘नाही, नाही, नाही’ म्हणत कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चिमुकल्याकडून फारसा प्रतिकार होणार नाही हे लक्षात आल्यावर एक कुत्रा पुढे सरसावला आणि चिमुकल्याच्या अंगावर झेप घेतली. त्यापाठोपाठ इतर कुत्र्यांनीची या लहान मुलाला घेरले. Pune

पहिल्या कुत्र्याने झेप मारल्यानंतर हा चिमुकला जमिनीवर पडला. आजुबाजूला अनेक कुत्रे आल्यानंतर या चिमुकल्याने पुन्हा उठून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी कुत्र्यांच्या झुंडीने या चिमुकल्याला पुन्हा जमिनीवर पाडत त्याच्यावर हल्ला चढवला.

कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केले. हा सगळा गलका ऐकून जवळच असलेल्या घरातून एक महिला बाहेर आली. तिनेही या कुत्र्यांना हाकलवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतरही काही माणसं त्याठिकाणी आली आणि त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!