Pune Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पुण्यातील हडपसर येथील धक्कादायक घटना…

Pune Crime : अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक बलात्कार करुन त्याला धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरातून समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश भालेराव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी (ता.२४) दुपारी पावणेचार वाजता घडला आहे. याप्रकणी मुलाच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा घरी झोपला होता. त्यावेळी सुरेश भालेराव हा घरी आला. त्याने मुलाची पँट काढून त्याच्याबरोबर अनैसर्गिक अत्याचार केला. Pune Crime
मुलाने विरोध केल्यावर त्याला तुला रोहित वाईन्सला घेऊन जातो, मग आपण जेवायला जावू असे म्हणून कोणास काही सांगू नको, अशी धमकी दिली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे तपास करीत आहेत.