Pune Crime : इंन्स्टाग्रामची ओळख पडली महागात, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेक्कन परिसरातील धक्कादायक घटना..

Pune Crime पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
इंन्स्टाग्रावर ओळख झालेल्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डेक्कन परिसरात घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकणी कर्वेरोड परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीच्या ४२ वर्षीय आईने सोमवारी (ता.१५) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत चव्हाण (वय.२० पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या १७ वर्षीय मुलीची आणि आरोपीची ओळख इंन्स्टाग्रावर झाली. आरोपीने तिच्यासोबत ओळख वाढून मैत्री केली. यानंतर फिर्यादी यांच्या मुलीला डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने सेक्स पावरची गोळी खाल्याचे सांगून शारीरिक संबंधाची मागणी केली. Pune Crime
तसेच शारीरिक संबंध ठेवले नाही तर मी मरुन जाईल अशी भिती घातली. पीडित मुलीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.