Pune Crime News : धक्कादायक! अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे, फुरसुंगी येथील ५५ वर्षाच्या नराधमाला बेड्या…

Pune Crime News पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ५५ वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (ता. २८) रात्री नऊच्या सुमारास फुरसुंगी येथे घडला आहे. Pune Crime News
याप्रकणी पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यशवंत काळुराम जाधव (वय. ५५ रा. फुरसुंगी) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी आरोपीच्या नातीसोबत खेळण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीने त्यांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले.
हा प्रकार मुलीच्या आईला समजताच त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.