Pune Crime News : कोयता गँग पुण्याची पाठ सोडेना! हल्ले सुरुच, सलग दोन दिवस भररस्त्यात राडे, नेमकं काय घडलं?

Pune Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तसेच अलीकडे पुण्यात कोयता हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यातच गैरसमजातून पुण्यात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना पुण्यातील कोंढवा भागात घडली आहे. या प्रकरणी ३ जणांना पोलिसांकडून याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे .
सविस्तर माहिती अशी की, गुप्ता हे त्यांच्या पानाच्या दुकानात बसले होते. अचानक ३ अनोळखी व्यक्तींनी यांनी फिर्यादी यांच्या दुकानाजवळ येऊन, फिर्यादी यांचे टपरीवरील सामान खाली फेकुन नुकसान करुन, त्यातील एकाने त्याचेजवळील कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार केले.
धर्मेंद्र गुप्ता यांनी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तात्काळ या तिन्ही आरोपींना अटक केलीय या घटनेचा सी सी टिव्ही फुटेज आता समोर आले आहे. Pune Crime News
दरम्यान, त्यासोबतच दुसऱ्या घटनेत गाडीची लाईट चमकवली म्हणून २० जणांच्या टोळक्याकडून २ तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील कोंढवा परिसरात राडा पाहायला मिळाला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आता समोर आला. कोंढवा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या १० ते ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या महमदवाडी येथे २ तरुण कॉफी पिण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या दुचाकीची लाईट समोर असलेल्या तरुणांच्या डोळ्यावर चमकावली. यातून त्यांच्या दोन्ही गटात वादावादी सुरू झाली.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्याच ठिकाणी असलेल्या रस्त्यावर एका गटाने समोरच्या तरुणाला त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या घटनेमुळे काही वेळासाठी या परिसरात भीतीचे वातावरण होते. या संपूर्ण प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.