Pune Crime : वाघोलीत घडली भयंकर घटना, वडिलांकडून अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या, लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनीच मुलीचा अतिशय निर्घृणपणे खून केल्याची घटना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली परिसरात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अक्षदा फकीरा दुपारगुडे (वय १५, सध्या राहणार वाघोली, मूळ सोलापूर) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मिळालेल्या माहिती नुसार, जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या केली. बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलांने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कुऱ्हाडीने डोक्यात, हातावर, पायावर वार केले. Pune Crime
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षदाला रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली. अक्षदावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला.
दरम्यान माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीच्या मावशीच्या पतीच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.