Pune : पुण्यात नागरी वन उद्यानातील खाणीत बुडून मुलाचा मृत्यू, वारजेत दुर्दैवी घटना…


Pune : केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडुन साकारण्यात आलेल्या रामनगर गणपती माथा टेकडीवरील नागरी वन उद्यानातील खाणीतील पाण्यामध्ये पोहायला गेलेल्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे हि घटना वारजेतील रामनगर परीसरात घडली आहे.

दक्ष सुशांत कांबळे (वय वर्षे. १३ रा. रामनगर वैदुवाडी परीसर वारजे पुणे) असे पाण्यात बुडुन मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, वारजेतील रामनगर टेकडी परीसरालगत नागरी वन उद्यान असुन या उद्यानातील पावसाचे पाणी साचलेल्या खाणीतील खड्ड्यामध्ये गुरुवार (ता.१५) रोजी दुपारच्या वेळी साधारण तेरा ते चौदा वर्षाची चार मुले पोहायला गेली होती त्यातील मयत दक्ष कांबळे हा पोहताना पाण्यात बुडाला त्या सोबतची तिन मुले घाबरून गेल्याने त्यांनी दक्ष पाण्यात बुडाल्याची माहीती घरी दिली नाही.

मात्र सायंकाळ पर्यंत दक्ष घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहीती दिली. या घटनेची माहीती वारजे माळवाडी पोलीसांना मिळताच वारजे पोलीस आणि वारजे अग्निशमन दलाचे जवान रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले. Pune

अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोध कार्य केले त्यानंतरही मृतदेह सापडला नव्हता त्यानंतर पोलीसांनी आणलेल्या एका व्यक्तीने रात्री सव्वा बाराच्या सुमारास खाणीतील पाण्यात उतरून मुलाचा मृतदेह शोधला त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससुन रुग्णालय येथे पाठविण्यात आला. मुलाच्या दुर्देवी मृत्यूने रामनगर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!