दौंडमध्ये खळबळ! घरात गरोदर महिलांची वर्दळ, छापा टाकताच धक्कादायक प्रकार उघड; घटनेने सगळे हादरले..


दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात गर्भलिंग निदानाच्या बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घरातून सुरू असलेल्या गुप्त सोनोग्राफी केंद्रावर छापा टाकत दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, केडगाव परिसरातील एका घरात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या मदतीने गर्भलिंग तपासणी केली जात होती. या बेकायदेशीर कामासाठी गरोदर महिलांकडून 35 ते 50 हजार रुपये आकारले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणामागे दलाल, एजंट आणि काही वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. 20 मे रोजी छापा टाकून मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार 24 मे रोजी वाघोली येथून डॉ. जाधव यालाही अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात PCPNDT कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणातील धागेदोरे तपासत असताना आणखी काही डॉक्टर आणि संबंधित व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कारवाईनंतर पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!