डाळींब बन श्री विठ्ठल देवस्थानच्या विकासाला सहकार्य करणार; क्रीडाराज्य मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा….


उरुळीकांचन : श्री विठ्ठल देवस्थान डाळींब बनच्या विकासकामांसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे अश्वासन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले आहे.

डाळींब बन (ता.दौंड) येथील श्री विठ्ठलाची आषाढी एकादशीची महापूजा रविवार ( दि.६) रोजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे व त्यांच्या पत्नी सारीका भरणे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमात दत्तात्रय भरणे हे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंडचे आमदार राहुल कुल , माजी आमदार रमेश थोरात, सरपंच बजरंग म्हस्के, ‘यशवंत’चे मोहन म्हेत्रे, नवनाथ काकडे, श्री विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यय रामदास चौधरी, दौंडचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, महाराष्ट्रात सांस्कृतिक अध्यात्मात वारकरी सांप्रादायाचे मोठे महत्त्व आहे.आषाढी वारी,कार्तिक यात्रा तसेच संजीवनी समाधी सोहळ्यांत एकरुप होऊन पांडुरंगाचे स्मरण करणे मोठा श्रध्देचा भाग आहे. या श्रध्येतून आत्मसमाधान शोधण्याचा प्रयत्न वारकरी करीत आहे. श्रध्येचे ठिकाण असलेल्या श्री विठ्ठल देवस्थानच्या डाळींब बनच्या विकासाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे भरणे यांनी सांगितले.

आमदार राहुल कुल म्हणाले, डाळींब बन परिसरात विकासाचे सर्व कामे करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तसेच ग्रामविकास विभागाकडून विशेष निधी तालुक्याला मिळणार आहे. खुपटेवाडीफाटा येथून डाळींब व परिसरात सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी २५० कोटी रुपये तरतुद करणार असल्याचे सांगून पुणे -सोलापूर महामार्गावरील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी उन्नत मार्गाच्या कामाचे टेंडर निघाल्याने या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणार असल्याचे आ.कुल यांनी सांगितले. दरम्यान कार्यक्रमात सरपंच बजरंग म्हस्के,श्री विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन,माजी आमदाररमेश थोरात यांनी आपले विचार व्यक्त केले.

‘पीएमआरडीए’च्या मनमानी कारभाराची व्यवस्था करु- राहुल कुल

पीएमआरडीए च्या विकास आराखड्यात झालेल्या ‘डीपीआर’ मध्ये मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द केला आहे. त्यामुळे पीएमआरडीए हद्दीत नागरीकांना मनमानी पध्दतीने त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास या कारभाराची व्यवस्थेचा बंदोबस्त करु असा इशारा आमदार राहुल कुल यांनी कार्यक्रमात दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!