Politics News : राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी ३ फॉर्म्युलांची जोरदार चर्चा!! अजित पवारही होणार मुख्यमंत्री? आतली माहिती आली समोर….

Politics News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.
महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना मिळून २३४ जागा मिळाल्या असून, यामध्ये भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच भाजपला १३२ जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम ठेवावे, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे.
त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार, याची चर्चा सुरु असताना एक नवी माहिती समोर आली आहे. त्यानुसार महायुतीकडून मुख्यमंत्रिपदासाठी १-४ चा फॉर्म्युला अंमलात आणला जाऊ शकतो. या फॉर्म्युलानुसार एकनाथ शिंदे यांना पुढील एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले जाऊ शकते. त्यानंतरची चार वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. Politics News
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची मराठाविरोधी ही तयार झालेली प्रतिमा आगामी काळात अडचण ठरु शकते. पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकी संपेपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवले जाऊ शकते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सुत्रे दिली जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
अजितदादांनाही मुख्यमंत्रीपद मिळणार?
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, यासाठी आणखी एका नव्या फॉर्म्युलाचीही जोरदार चर्चा आहे. त्यानुसार आधी दोन वर्षे देवेंद्र फडणवीस यांना, त्यानंतर दोन वर्षे एकनाथ शिंदे यांना आणि त्यानंतर एक वर्षे अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशीही चर्चा आहे. तसेच फडणवीस आणि शिंदे यांच्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची वाटणी होईल, अशाही फॉर्म्युलाची चर्चा सुरु आहे.