राज्यात राजकीय घमासान!! चित्रा वाघ म्हणाल्या तुमच्यासारखे 56 जण पायाला बांधून फिरते, अन् सुषमा अंधारे म्हणाल्या, लोकं तर जास्त आकडा सांगतात….


मुंबई : राज्यात दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन मोठा गोंधळ सुरु आहे. काल विधानसभेत मोठा राडा पाहायला मिळाले. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले. यावरुन चित्रा वाघ यांनी टीका केली.

यावेळी चित्रा वाघ यांनी तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. मी काय वशिल्याने आले नाही, असे विधान चित्रा वाघ यांनी केले होते. यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघात केला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सुषमा अंधारे यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्यांना ही भाषा कोणत्या शाळा–कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही, सभागृहाची सुसंस्कृत परंपरा, गरिमा धाब्यावर बसवत, एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या त्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा त्यांना कोणत्या शाळा–कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही.

पण हे दरवेळी सांगायची गरज काय, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात! याबद्दल माझ्यापेक्षा अधिक आमदार जितेंद्र आव्हाड, मेहबूब शेख सारखे जाणकार अधिक विस्ताराने मांडू शकतील, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. यामुळे आता वाद सुरु झाला आहे.

दरम्यान, सेलिबेट्री मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन काल विधानसभेत मोठे घमासान पाहायला मिळाले. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता या प्रकरणावरुन विधानसभेसह विधानपरिषदेतही गदारोळ झाला. यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!