राजकीय वर्तुळात खळबळ!! भाजप नेत्याच्या हॉटेलमध्ये हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेट, तरुण मुली अन्…

जबलपूर : राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता जबलपूरच्या गढा भागात एका भाजप नेत्याच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा धक्कादायक खुलासा झाला आहे. ‘अतिथी’ नावाच्या या हॉटेलमध्ये दररोज मोठ्या पार्ट्या होत असत.
हे रॅकेट इतके मोठे होते की, कोलकाता, आसाम, झारखंड आणि छत्तीसगड येथून मुलींना येथे बोलावले जात होते. इतकेच नाही, तर या मुलींना राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तसेच या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटला भाजप नेते अतुल चौरसिया आणि त्याचा साथीदार शीतल दुबे चालवत होते, असे तपासात समोर आले आहे. आसाममधील एका महिलेच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, या महिलेने पोलिसांना सांगितले की, तिला चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून जबलपूरला आणण्यात आले, आणि त्यानंतर तिला येथे देहव्यापारात ढकलण्यात आले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, भाजप पक्षाने अतुल चौरसियाला पक्षातून निष्कासित केले आहे.
३२ वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तीन वर्षांपूर्वी आसाममध्ये मनीषा नावाच्या एका महिलेने तिला चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून जबलपूरला बोलावले होते. येथे तिला भाजप नेते अतुल चौरसिया यांच्या हॉटेल ‘अतिथी’मध्ये ठेवण्यात आले आणि नंतर तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिला जिस्मफरोशीमध्ये ढकलण्यात आले.
पीडित महिलेने सांगितले की, येथे मुलींना नेते, अधिकारी आणि इतर प्रभावशाली व्यक्तींकडे पाठवले जात होते. दररोज रात्री वेगवेगळ्या गाड्यांमधून लोक येत असत, मुलींना त्यांच्या खोल्यांपर्यंत पोहोचवले जात असे आणि सकाळी कोणताही रेकॉर्ड न ठेवता ते लोक निघून जात असत. याच हॉटेल ‘अतिथी’मध्ये बाहेरून मुलींना बोलावले जात होते.
पीडितेनुसार, हा देहव्यापाराचा धंदा गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. मुलींना दुसऱ्या राज्यांतून मागवले जात होते, आणि हॉटेलचा स्टाफही या रॅकेटमध्ये पूर्णपणे सामील होता. ग्राहकांच्या पसंतीनुसार मुलींना त्यांच्याकडे पाठवले जात असे. बहुतेक ग्राहक प्रभावशाली व्यक्ती असत, ज्यांची नावे विचारण्याची कोणालाही परवानगी नव्हती, परंतु त्यांच्या वागणुकीतून आणि गाड्यांवरून त्यांची ओळख स्पष्ट होत होती.
या रॅकेटचा दुसरा मुख्य आरोपी शीतल दुबे (वय ३८), जो डिंडोरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. शीतल स्वतःला ‘किन्नर’ सांगतो. तो भाजप नेते अतुलच्या संपर्कात होता आणि मुलींची व्यवस्था करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, ग्राहकांशी व्यवहार करणे आणि प्रभावशाली व्यक्तींपर्यंत त्यांना पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तो स्वतः ग्राहकांशी व्यवहार करत असे आणि त्यांचा विश्वासार्ह एजंट होता.
दरम्यान, पीडित महिलेने सांगितले की, ग्राहकांकडून एका भेटीसाठी ३ हजार ते १० हजार रुपये घेतले जात असत, तर मुलींना मात्र ५०० ते १००० रुपये दिले जात असत. या संपूर्ण सिस्टीममध्ये दलाल, हॉटेल संचालक आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठी कमाई होत होती, तर मुलींना बंधुआ मजूर बनवले जात होते.
पीडितेने असेही सांगितले की, हॉटेलमध्ये परवाना नसतानाही दारू विकली जात असे. ग्राहकांना खोलीतच दारू दिली जात असे आणि नंतर मुलींना पाठवले जात असे. हॉटेलमध्ये नेहमी पार्ट्या चालत असत, असा आरोपही पीडित महिलेने केला आहे.