Petrol Diesel Price : निवडणुका जवळ तरीही महागाईचा झटका! राज्यात अनेक ठिकाणी वाढले पेट्रोल डिझेलचे दर, जाणून घ्या..


Petrol Diesel Price : राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे.

तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करत असते. राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर डिझेलच्या देखील किमतीत खूप वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात, अशी आशा व्यक्त केली जात आहे. Petrol Diesel Price

अशातच आता सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण आज आंतरराष्ट्रीय बाजारात अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आजही भारतीय तेल विपणन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २७ पैशांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पेट्रोल- डिझेलचे दर पुढील प्रमाणे…

पुणे शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०५.८४ रुपये तर डिझेलचा दर ९२.३६ रुपये प्रतिलिटर.

मुंबई शहरात पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.

नाशिकमध्ये पेट्रोल १०६.४२ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९२.९३ रुपये प्रतिलिटर.

नागपुरात पेट्रोलचा दर १०६.०७ रुपये तर डिझेलचा दर ९२.६२ रुपये प्रतिलिटर.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०९.०३ रुपये दराने आणि डिझेल ९५.७१ रुपये प्रति लीटर .

छत्तीसगड, झारखंड आणि गुजरात या काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!