पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात खळबळ ; तब्बल १५ हरणांचा मृत्यू, नेमकं कारण काय?
Panic at Rajiv Gandhi Zoological Park in Pune; As many as 15 deer die, what is the exact reason?

पुणे : पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 15 चितळ प्रकारातील हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्रशासनाची चिंता वाढली असून हरणांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये सात जुलैपर्यंत 39 नर आणि 60 मादी अशी एकूण 99 चितळे होती. त्यापैकी 15 हरणांचा मृत्यू झाल्याने प्राणी संग्रहालयात खळबळ उडाली आहे. मृत चितळाच्यां शरीराचे अवयव आणि रक्ताचे नमुने तपासासाठी देशभरातील प्रमुख प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्रतीक्षेत असल्याने मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकारामुळे
प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे 4 ते 5 दिवसांपासून हा प्रकार सुरु असताना महापालिका प्रशासाने हि माहिती सपवण्याच प्रय़त्न केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान या प्राणिसंग्रहालयातील मृत हरणांचे शवविच्छेदन क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशु रोग तज्ञांनी केले आहे. तसेच, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओरिसा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे. जर हा साथीचा रोग असेल, तर त्याचा मनुष्यावर काही परिणाम होऊ शकतो का, याचीही तपासणी केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.
