उद्या दुकानाचे उद्घाटन अन् आज आढळला मृतदेह, कुंजीरवाडीत तरुणासोबत काय घडलं? घटनेने उडाली खळबळ..

उरुळी कांचन : थेऊर (ता.हवेली) येथे एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.5) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती.
ही घटना ताजी असतानाच आता दुकानाचे उद्घाटन उद्या मंगळवारी (ता.7) असतानाच, आज सोमवारी (ता. 6) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तरुणाचा मृतदेह कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका विहिरीत आढळून आला आहे. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपल्याने कुंजीरवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे.
गौरव शशिकांत कुंजीर (वय-35, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) असे मृतदेह आढळल्याने नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत कुंजीर हे कुटुंबासोबत कुंजीरवाडी परिसरात राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये आहेत. मुलगा गौरव कुंजीर हा शेतीची ठिबक सिंचनची कामे करीत होता. तर गौरव कुंजीर हा ठिबक सिंचनचे साहित्याचे दुकान टाकणार होता. त्यासाठी गौरवने दुकानही पहिले होते. व या दुकानाचे उद्घाटन उद्या मंगळवारी (ता.७) करण्यात येणार होते. यामुळे घराचे सर्व आनंदात होते.
दरम्यान, रविवारी (ता.5) संध्याकाळी गौरव घरातून गेला तो परत घरी आलाच नाही. त्यामुळे गौरव चे वडील व नातेवाईक त्याचा शोध घेत होते. मात्र गौरव कोठेही आढळून आला नाही. कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर हे शेताकडे चालले होते. तेव्हा मिलिंद कुंजीर यांना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. 916 मधील विहिरीच्या काठावर एक चप्पल आढळून आली. त्यामुळे गौरव कुंजीर हा विहिरीत बुडाला असल्याची शंका त्यांच्या मनामध्ये आली.
त्यानंतर पोलीस पाटील कुंजीर यांनी या घटनेची माहिती तत्काळ लोणी काळभोर पोलीस व अग्निशामक दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकांत खोसे, पोलीस हवालदार विजय जाधव, दादा हजारे, पोलीस अंमलदार सागर कदम व अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर गौरवला पाण्यातून बाहेर काढले. व उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
गौरवच्या दुकानाचे उद्या मंगळवारी उद्घाटन होणार होते. दुकानाचे उद्घाटन होण्याअगोदरच गौरवचा मृतदेह आज सोमवारी विहिरीत आढळला आहे. त्यामुळे कुंजीरवाडी सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा गौरव हरपल्याने कुंजीर कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. गौरव कुंजीर याच्या मृत्यूचे नेमके करण अद्याप समोर आले नसले तरी त्या दृष्टीकोनातून लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.