आरटीईमध्ये प्रवेश घेणाऱ्या पालकांनाच शुल्क भरावे लागणार, नेमकं कारण काय?, महत्वाची माहिती आली समोर…


पुणे : आरटीईनुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनासाठी महत्वाची बातमी आहे. आरटीईनुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क त्यांच्या पालकांना प्रवेशाच्या वेळी भरावे लागणार आहे. आरटीईतील तरतुदीनुसार गरिबांसाठी २५ टक्के जागा या आरक्षित असतात.

त्यामुळे या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात RTE शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल २४०० कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे पुण्यात यंदाच्या आरटीई ॲडमिशनसाठीचं पूर्ण शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार आहे.

दरम्यान सरकार आणि संस्थाचालकांच्या या वादात पालक-विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत. सरकारच्या दिरंगाईचा पालकांना फटका बसणार आहे. राज्यभरात आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल २४०० कोटी रूपये थकीत आहेत.

त्यामुळे यंदाच्या आरटीई ॲडमिशनसाठीची पूर्ण शाळेत शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार आहे . तसा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतला आहे. शुल्क आगाऊ स्वरूपात घेण्याच्या असोसिएशनच्या निर्णयाने पालकांना शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आरटीईच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे.

सरकारकडून प्रतिपूर्ती वेळेवर मिळत नसल्याने संस्था चालवणं अवघड असल्याचं संस्थाचालकांचं म्हणणं आहे. दरम्यान सरकार आणि संस्थाचालकांच्या या वादात पालक आणि विद्यार्थी भरडले जात आहेत. त्याशिवाय, कायद्याच्या तरतूदींचे उल्लंघन होत आहे. राज्यभरात एक लाखापेक्षा अधिक प्रवेश हे आरटीईमधून होतात.

मात्र आता संस्थाचालकांनी घेतलेल्या भूमिकेने पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार असल्याची भीती आहे. पुण्यातील संस्थाचालकांनी घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर संस्थाचालक ही अंमलात आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त पुणेच नव्हे तर राज्यभरातही आरटीईनुसार होणाऱ्या प्रवेशांवर परिणाम होण्याची भीती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!