अनैतिक संबंधात अडथळा, प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून, हडपसरमध्ये रात्री दीड वाजता स्कुटरवर मृतदेह ठेवला अन्…


पुणे : पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पुण्यातील गुन्हेगारांना कायद्याचं कोणतही भय उतरलं नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता पुण्यात अनैतिक संबंधातून पतीची पत्नीकडून आणि प्रियकराकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हत्यानंतर पतीचा मृतदेह पोत्यात घालून ५५ किलोमीटर दूर नेला अन् विल्लेवाट लावल्याचं देखील समोर आले आहे . या घटनेने एकच खळबळ उडाली आह.

सिद्धेश्वर भिसे असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी योगिता भिसे आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.प्रियकराच्या मदतीने आपण पतीचा काटा काढल्याची कबुली पत्नीने दिली आहे. विशेष म्हणजे सिद्धेश्वर याच्या पत्नीनेच आपला पती बेपता असल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता भिसे आणि शिवाजी सुतार यांचे काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मात्र पती या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळे पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा काटा काढण्याचे ठरवले.

दरम्यान, त्यानुसार ३ मार्च २०२५ रोजी हडपसर येथील घरी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. त्यांतर साड्यांच्या कापडांनी हात-पाय बांधून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरला. पतीचा मृतदेह दुचाकीवरून भोर जवळ असणाऱ्या सारोळा परिसरातील नीरा नदीपात्रात फेकून दिला.

याप्रकरणी राजगड पोलिसांनी योगिता भिसे, आणि तिचा प्रियकर शिवाजी सुतार या आरोपींना अटक केली आहे. राजगड पोलिसांनी मृताच्या अंगावर असणाऱ्या शर्टच्या टॅग वरून मृताची ओळख पटवली. तसेच त्याच्या हातावरील गोंदवलेल्या खुणेवरुन (ॐ च्या टॅटू) ओळख पटवली. अनैतिक प्रेम संबंधामध्ये अडथळा ठरत असल्यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!