आता कमी सीबील स्कोर असला तरी काळजी करू नका! टाटांच्या टाटा कॅपिटलमध्ये मोठी ऑफर, सहज मिळणार कर्ज…

मुंबई : अनेकदा एखाद्या व्यक्तीचा CIBIL स्कोर कमी असेल, तर त्याला कर्ज मिळत नाही. त्याला अनेक अडचणी निर्माण होतात. ज्यांचा स्कोर 650 पेक्षा कमी आहे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. असे असताना टाटा कॅपिटलने कमी CIBIL स्कोर असणाऱ्यांसाठी एक खास आणि मदतीची योजना सुरू केली आहे. याचा अनेक गरजूंना फायदा होणार आहे.
या योजनेतून व्यक्तींना 40,000 पर्यंतचे वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते, जे त्यांच्या तातडीच्या गरजांमध्ये त्यांना उपयोगी पडणार आहे. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांचा CIBIL स्कोर 650 च्या आसपास आहे. पण तरीदेखील नियमित उत्पन्न असल्यामुळे ते कर्ज परतफेड करण्यास सक्षम आहेत.
या योजनेत १२% ते १८% दरम्यान वार्षिक व्याजदर आकारला जातो, ही योजना व्यक्तीचा क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठीही एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही वेळेवर EMI भरता, तर तुमचा स्कोर हळूहळू सुधारतो आणि भविष्यात अधिक मोठ्या कर्जासाठी पात्र होण्याची शक्यता वाढते. यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे.
या योजनेसाठी अर्जदाराचे मासिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा अधिक असावे लागते. यामध्ये टाटा कॅपिटल तुमची परतफेड करण्याची क्षमता तपासते. हे तपासूनच पुढील गोष्टी केल्या जातात. ज्या व्यक्तींचा स्कोर कमी आहे, त्यांच्याकडून काही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाते.
जर हे सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे सादर केल्यास कर्ज मंजूरीची प्रक्रिया अधिक लवकर होते. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्ता पुरावा, मासिक उत्पन्नाचे पुरावे, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, हे मुख्यता लागते. यासाठी जास्त काळ लागत नाही. ती लगेच मिळतात. यामध्ये टाटा कॅपिटल तुम्हाला सोयीप्रमाणे EMI निवडण्याची मुभा देते. यामुळे आर्थिक ताण न घेता हळूहळू कर्जाची परतफेड करता येते. हा एक महत्वाचा फायदा आहे.
टाटा कॅपिटलचे अधिकृत ॲप Google Play Store किंवा iOS Store वरून डाउनलोड करून तुम्ही थेट मोबाईलवरून सुद्धा अर्ज करू शकता. यासाठी कुठे न जाता तुम्ही कर्ज घेऊ शकता. जर तुमचा CIBIL स्कोर कमी असेल आणि तुम्हाला छोट्या रकमेचा वैयक्तिक कर्ज घेण्याची गरज भासत असेल, तर टाटा कॅपिटलची ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.