निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री…!! राणे बंधूंमध्ये जुंपली, नितेश राणे नेमकं काय म्हणाले? वादाचे कारण काय?

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटलाय. निधीवाटपावरून सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. धाराशिव जिल्ह्यात 2029 ला सर्व खासदार आणि आमदार भाजपचेच आले पाहिजेत, असं भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे यांनी म्हटलं.

यावर नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत नितेश राणेंनी जपून बोलावं असा सल्ला दिल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र नितेश राणेंना सल्ला देणारं ट्वीट निलेश राणेंनी डिलीट केल्याचे समोर आले आह. मात्र यावर निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात, असं नितेश राणे म्हणालेत. बघा दोन्ही राणे बंधूंमध्ये जुंपली आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवरून वाद सुरूये. भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटलांच्या तक्रारीनंतर काही कामांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, आता नीलेश राणे यांच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमध्ये सर्व काही ठीक आहे का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा परिणाम देखील दिसून येऊ शकतो. राणे बंधूंमधील या मतभेदांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. राणे बंधू अनेकदा वेगवेगळी वक्तव्य करत असतात. यामुळे स्वतःच्याच पक्षामध्ये मोठी अडचण निर्माण होते.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्व पक्ष तयारी करत आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. नीलेश राणे यांनी भावाला सार्वजनिक ठिकाणी विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला होता. ते ट्विट डिलीट करण्यात आले आहे. यामुळे सध्या राणे बंधूंची चर्चा सुरु आहे.