New Year Gift : मद्यप्रेमींची होणार दिवाळी! आता नाताळ-नववर्षाच्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार वाईन शॉप..

New Year Gift : मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. शासनाने तीन दिवस ही परवानगी दिली आहे.
या महिन्यात २४, २५ आणि ३१ डिसेंबरला मद्य किरकोळ विक्रीची दुकाने रात्री १०.३० ते रात्री १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. याबाबत एक्साईज विभागाने एक परिपत्रक देखील जारी केले आहे.
या परिपत्रकात लिहिले आहे की, उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्रास अनुलक्षून महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम १३९ (१) (सी) व कलम १४३ (२) (एच १) (iv) अन्वये खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे नाताळ व नववर्षानिमित्त दिनांक २४.१२.२०२३, दिनांक २५.१२.२०२३ व दिनांक ३१.१२.२०२३ रोजी राज्यातील विविध मद्य विक्री अनुज्ञप्त्या निर्धारित वेळेनंतर रात्री उशीरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. New Year Gift
दरम्यान, महानगरपालिका, अ, व आणि ब वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत बार आणि वाईन शॉप सुरु राहणार आहे. त्यामुळे शासनाने तीन दिवस ही परवानगी दिल्याने मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.