१ डिसेंबरपासून गॅस सिलिंडरबाबत नवे नियम? अनुदान सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी आधीच करा हे काम…


मुंबई : देशभरातील घरगुती गॅस ग्राहकांसाठी आधार ई-केवायसी महत्त्वाची ठरत आहे. इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांनी आपल्या आधार बायोमेट्रिक पडताळणीची स्थिती तपासून घेणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण नसल्यास पात्र ग्राहकांच्या एलपीजी अनुदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस ग्राहकांनी ई-केवायसीबाबतची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

अनुदानासाठी ई-केवायसी आवश्यक
घरगुती एलपीजी सिलिंडरवर अनुदान मिळवण्यासाठी पात्र ग्राहकांची आधार बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस या तिन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना ही प्रक्रिया लागू आहे. ई-केवायसी प्रलंबित असल्यास अनुदान मिळण्यात अडचण येऊ शकते. मात्र, नोव्हेंबर महिन्यात या प्रक्रियेसंदर्भात कोणतेही नवीन नियम जाहीर झालेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आधी ई-केवायसी केली असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही
ज्या ग्राहकांनी यापूर्वीच आधार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. अशा ग्राहकांचे नियमित गॅस बुकिंग सुरू राहू शकते. मात्र, ज्यांची पडताळणी अद्याप बाकी आहे, त्यांनी ती लवकर पूर्ण करून घ्यावी.

मोबाईल ॲपवरून घरबसल्या करता येणार प्रक्रिया
ग्राहकांना गॅस सिलिंडरच्या घरपोच वितरणावेळीही बायोमेट्रिक पडताळणी करता येते. यासाठी गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याची मदत घेता येते. तसेच संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपवरूनही ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

– इंडेन ग्राहक: IndianOil One ॲप
– भारत गॅस ग्राहक: HelloBPCL ॲप
– एचपी गॅस ग्राहक: HP Pay ॲप
या ॲप्समध्ये फेस ऑथेंटिकेशनची सुविधाही उपलब्ध आहे.

ॲपवर प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर काय करावे?
मोबाईल ॲपवर ई-केवायसी करताना अडचण आल्यास ग्राहक आपल्या नोंदणीकृत गॅस एजन्सीमध्ये जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. तसेच अनुदानाचा लाभ न घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडरचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी संबंधित तेल कंपनीकडे आपली पसंती नोंदवावी लागते.

ई-केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार का?
ई-केवायसी पूर्ण न केल्याने गॅस कनेक्शन आपोआप बंद होत नाही. मात्र, पात्र अनुदान मिळण्यात किंवा सवलतीच्या दरातील पुढील रिफिल घेताना अडचणी येऊ शकतात. ग्राहकांना उपलब्धतेनुसार ५ किलो आणि १० किलोचे सिलिंडरही मिळू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी आपली ई-केवायसी स्थिती तपासून आवश्यक असल्यास पडताळणी पूर्ण करून घ्यावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!