NCP MLA Disqualification : मोठी बातमी! शरद पवारांना ‘ही’ चूक महागात पडणार, हातातून जाणार राष्ट्रवादी पक्ष?


NCP MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर लागले आहे. अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांची एक चूक खूप महागात पडण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज प्रथमच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवली.

जितेंद्र आव्हाड यांना एक प्रश्न विचारला असता त्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या उत्तरामुळे या प्रकरणी एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. कदाचित हा मुद्दा अजित पवार गटाच्या फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. NCP MLA Disqualification

जितेंद्र आव्हाड यांना पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न विचारताच त्यांनी पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. पण confidential कपाटात हे कागदपत्र ठेवले होते. जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते हरवली.

संबंधित माणसं पक्ष सोडून गेली असून त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही, असं मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यावरून आता पक्ष शरद पवारांच्या हातून जातो की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!