Narayan Rane : नारायण राणे यांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, दिशा सालियनवेळी उद्धव ठाकरेंनी मला…

Narayan Rane : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे.
याच पार्शभूमीवर भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नारायण राणे यांच्याकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन वारंवार आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाचे पुरावे विधानसभेत बंद लिफाफ्यात सादर केले होते. या प्रकरणी तपास सुरु आहे. Narayan Rane
पण अद्याप त्याबाबत काहीच माहिती समोर येऊ शकलेली नाही. असं असताना नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता. या फोनमधून त्यांनी आदित्यला सांभाळून घ्या, अशी विनंती केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला.
यावेळी नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना फोन लावून दिला. आदित्यला सांभाळून घ्या. तुम्हालाही दोन मुलं आहेत, असं मला फोनवर उद्धव ठाकरे बोलले. मग मी सांगितलं तुमच्या मुलाला असे संध्याकाळचे सोडू नका सातच्यानंतर, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जोडो मारो आंदोलनाला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांना दुसरं काय येतं, जोडो मारो आंदोलन करणारे पुतळा उभारल्यानंतर आठ महिन्यात एकदा तरी नतमस्तक होण्यासाठी आले का? हे सगळं झाल्यानंतर डोकं आपटून घेत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.