Nagpur News : फुगा खरेदीचा हट्ट चिमुकल्याच्या जीवावर बेतला, सिलेंडरचा स्फोट होऊन ४ वर्षीय मुलाचा मृत्यू…

Nagpur News : नागपुरात एक भयानक घटना घडली असून बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानात रविवारी (ता.२४) रात्री फुग्यांच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिझान आसिफ शेख (वय. ४, रा. मानकापूर) असे सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर फरिया हबीब शेख (वय. २८) आणि अनमता हबीब शेख (वय. २४) असे जखमी महिलांची नावे आहेत. या घटनेनंतर फुगेविक्रेता फरार झाला असून पोली त्याचा शोध घेत आहेत. Nagpur News
मिळालेल्या माहिती नुसार, घटनास्थळच्या मैदानावर नेहमीच लोकांची गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी फुगे विक्रेते येत असतात. क्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने सिझान रविवारी रात्री आपल्या मावशीसोबत मैदानावर फिरण्यासाठी गेला होता.
फारिया व अनमता सिझानच्या मावशी आहेत. दरम्यान मैदानावर रात्री ८.३० वाजता एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता. फुगेवाल्याला बघताच सिझानने फुगा खरेदीचा मावशीकडे हट्ट धरला. दरम्यान, फुगेवाल्याच्या बाजूला तिघेही उभे असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. Nagpur News
हा स्फोट इतका भीषण होता, की सिलिंडर उंच हवेत उडाला. आग लागल्याने सिझान गंभीर जखमी झाला फरिया व अनमता यांनाही सिलिडर लागल्यामुळे दुखापत झाली.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी सिझानला मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या फुगेवाला फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत