“रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी मुक्ताईने पाठवली माऊलींना राखी”

प्रसाद बोराटे
आळंदी : आज भावा बहिणीच्या अतुट प्रेमाचा सण रक्षाबंधन.या पर्वावर श्री मुक्ताई संस्थान कोथळी मुक्ताईनगर यांच्या तर्फे विश्वस्त पुरुषोत्तम वंजारी यांनी सपत्नीक माऊलींचा अभिषेक, पूजा केली. विधिवत पुजनाने मुक्ताईची राखी माऊलींस बांधण्यात आली.
यावेळी सागर लाहुडकर महाराज, संदीप पालवे उपस्थित होते. तसेच यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे आदिशक्ती मुक्ताईस साडी चोळी (ओवाळणी,भेट) देण्यात आली.
याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. संत परंपरेतील संत मुक्ताई आपल्या संत भावास निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव यांना बालपणात बांधणारी राखीची अतूट प्रेमाचे बंधनाची परंपरा संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर आजही संभाळली आहे.
Views:
[jp_post_view]