Mukhyamantri Baliraja Vij Savalat Yojna : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना नेमकी काय? ४४ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा, राज्य सरकार १४ हजार कोटींचं अनुदान देणार, जाणून घ्या पूर्ण माहिती…


Mukhyamantri Baliraja Vij Savalat Yojna : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध प्रश्नांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना घोषित केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर असलेला शेतीपंपांचा वीज बिलाचा भार उचलण्याची शासनाने ठरवले असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या शेतीला पूर्णपणे मोफत वीज दिली जाणार आहे व या योजनेसाठी तब्बल १४,७६१ कोटी रुपयांचे अनुदान देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पात्रता? योजनेचा कालावधी?

आपल्याला माहित आहे की विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती आणि शेतकरी हे आर्थिक अडचणींमध्ये सापडल्याचे सध्या चित्र आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून ७.५ एचपी क्षमतेच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल २०२४ पासून मोफत वीज देण्याकरिता प्रामुख्याने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना- २०२४ एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ म्हणजेच पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. परंतु महत्वाचे म्हणजे तीन वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेतला

जाणार असून त्यानंतर तिच्या मुदतवाढीबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ७.५ एचपी पर्यंत मंजूर भार असलेल्या शेती पंप असलेले शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कधीपासून केली जाईल या योजनेची अंमलबजावणी?

या योजनेच्या माध्यमातून एप्रिल २०२४ पासून ७.५ एचपी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे व या वीज बिलाची रक्कम शासन महावितरण कंपनीला देणार असून १४,७६० कोटी रुपये राज्य सरकार महावितरण कंपनीला देणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ४४ लाख ३००० शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपाला मोफत वीज दिली जाणार आहे व याकरिता १४७६० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!