आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड! पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष थक्क करणारा प्रवास..


पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने ते आता या महत्त्वाच्या पदाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांची निवड एकमताने झाल्याने हे पद कोणत्याही राजकीय संघर्षाशिवाय त्यांना मिळाले आहे. आमदार अण्णा बनसोडे यांची संघर्षमय वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आहे.

पानटपरीवर काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते थेट महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा मेहनत, जिद्द यामुळे त्यांना ते मिळाले आहे. अण्णा बनसोडे यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. एका सामान्य कुटुंबातून येत त्यांनी पानटपरीवर काम करत संघर्ष केला आणि राजकारणात स्थान निर्माण केले.

त्यांनी 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरी मतदारसंघातून विजय मिळवला. या पदासाठी सुरुवातीला राजकुमार बडोले, संजय बनसोडे आणि अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत होती. मात्र अखेर एकमेव अर्ज अण्णा बनसोडे यांचा आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या बनसोडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्थानिक पातळीवर मजबूत पकड मिळवली.

राजकारणात येण्यापूर्वी पानटपरी व्यवसाय करत होते. याच काळात सामाजिक आणि राजकीय कार्यात कामे केली. पहिल्यांदा 1997 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक बनले. त्यानंतर सलग तीन टर्म नगरसेवक राहिले, तसेच महापालिकेतील सर्वात शक्तिशाली पदांपैकी एक असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

शहरातील विविध विकासकामांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये भाजपच्या लाटेत पराभव पत्करावा लागला. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला. 2024 मध्ये अजित पवार गटाची साथ देत तिसऱ्यांदा विधानसभा गाठली.

दरम्यान, 2024 मध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर ते मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना संधी न मिळाल्याने ते काहीसे नाराज होते. नंतर, विधानसभा उपाध्यक्षपद ही संधी त्यांना मिळाली, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे. अजित पवार यांनी याबाबतची संधी त्यांना दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!