हृदयद्रावक! देवदर्शनावरुन परतताना काळाचा घाला; मिनी ट्रकची ट्रकला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू…


अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद मध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बावला-बगोदरा महामार्गावर मिनी ट्रकची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला.

मृतकांमध्ये पाच महिला, दोन पुरुष आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व नागरिक कापडवंज येथील सुनादा गावातील निवासी होते.

मिळालेल्या माहिती नुसार, मिनी ट्रकमधील नागरिक हे चोटिला येथून देव दर्शन करुन अहमदाबादच्या दिशेने येत होते. यावेळी या मिनी ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातग्रस्त मिनी ट्रकच्या पुढील बाजुला ३ जण तर मागे १० जण बसले होते.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिक दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात ३ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!