Maratha Reservation : ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली, मराठा समाजाला मोठा दिलासा, २४ तारखेला होणार सुनावणी…

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा समाजाला जात आहे.
याबाबत बाबत माहिती देतांना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे की, क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे. येत्या २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे. Maratha Reservation
याच अर्थ असा होतो की, क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारले नसून, ते स्वीकारले आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल, असे विनोद पाटील म्हणाले आहेत.
राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलेहोतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये हे आरक्षण रद्द केलं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सरकारतर्फे क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आलेली होती.
क्युरेटिव्ह पिटीशन कोर्टाने स्वीकारले असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, २४ जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे. पिटीशन स्वीकारल्याने आशा निर्माण झाल्याचं विनोद पाटलांनी सांगितले. त्यामुळे सरकारसाठी आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.