Maratha Reservation : राज्य सरकारला ट्रॅक्टर आंदोलनाची भिती! मराठा आंदोलन कर्त्यांना पोलिसांच्या कारवाईच्या नोटीसा..!!

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून, याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावल्या जात आहेत.
तसेच येत्या २४ तारखेच्या अलटीमेटमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. ट्रॅक्टर घेऊन मराठा समाज मुंबईला येण्याची पोलिसांना भीती आहे. त्यामुळे ट्रॅक्टर धारक व्यक्तींनाही पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
पोलिसांची शेकडो मराठा कार्यकर्त्यांनावर करडी नजर आहे. नांदेड जिल्हयातील ही पोलीसांनी ट्रॅक्टर चालकांना नोटीसा पाठवल्या आहेत. मराठा नेते कार्यकर्ते आपल्याकडे ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर देऊ नये, किंवा आपण स्वतः ट्रॅक्टर सोबत घेऊन जाऊ नये, अशा आशयाची नोटिसा पोलीसांनी ट्रॅक्टर चालकांना दिल्या आहेत. Maratha Reservation
दरम्यान, येत्या २४ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मराठा समाज मोठया संख्येने जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातून मराठा बांधव ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जातील, अशी शक्यता असल्याने नोटीसा देण्यात आल्या. ट्रॅक्टर घेउन गेल्यास वाहतुकीस अडथळा, लोकांची गर्दी होईल.
त्यांच्याकडून जाळपोळ, गाड्या फोडणे, असे अनुचित प्रकार घडू शकतात. तसे काही झाल्यास आपल्याला जबाबदार धरून कारवाई करुन ट्रॅकटर जप्त केल जाईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी या नोटिसांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सरकारच्या पुढे अधिकारी कसे जाऊ शकतात? अधिकारी जाणूनबुजून नोटीस कसे काय देऊ शकतात? आम्ही कधी कोणत्या जातीविषयी बोलत नाही. पण त्याला आम्ही सोडणार नाहीत. ते आमच्या जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत, आम्ही शांत आहोत पण शांत राहणार नाही.
मराठवाड्यातील काही अधिकारी जातीयवाद करत आहेत. त्यांना कामावरून कमी केलं पाहिजे. सरकार गोरगरीब लोकांवर दबाव आणत आहेत तुम्हाला अधिकारी सांभाळायचे आहेत, असे जरांगे म्हणाले आहेत.