Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची येत्या ८ जूनला बीडमध्ये अतिशय भव्य अशी सभा होणार होती. तसेच मनोज जरांगे हे ४ जूनला उपोषणाला बसणार होते. पण मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट असल्यामुळे मनोज जरांगे यांनी ही सभा पुढे ढकलली.
तसेच त्यांनी उपोषणाची तारीख नव्याने जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. आपण ४ जून आधीच उपोषणाला बसणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान, मनोज जरांगे यांची आज तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. मनोज जरांगे हे काही दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर त्यांनी सभा घेतल्या. आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर मनोज जरांगे यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी विशेष लक्ष ठेवून आहेत. Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील यांच्यावर याआधीदेखील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांनी याआधी अनेकदा उपोषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरलं. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने जरांगेंच्या काही मागण्या मान्य केल्या.
त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडले. यानंतर जरांगेंवर गॅलेक्सी रुग्णालयातच उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.