Manoj Jarange Patil : मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा…

Manoj Jarange Patil : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना महायुतीने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी तयारी केली आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मेहनतीनंतर महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
तसेच मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे महायुती विशेषतः भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जरांगे फॅक्टर चालला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्यातील बहुतांश जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे.
राज्यातून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येत आहे. महायुतीने आणलेली लाडकी बहीण योजना, योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे आणि पीएम मोदींच्या एक है तो सेफ है, या नाऱ्यांनी संपूर्ण हिंदू एकवटला आणि महायुतीला भरभरुन मतदान दिल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, लोकसभेप्रमाणे यंदाही मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण मराठवाड्यातील ४६ जागांपैकी ३६ जागांवर महायुती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.