Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांना मोठा धक्का! पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली, अंतरवालीसह ‘या’ दोन गावांनीही सोडली साथ…


Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे जरांगे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षण मुद्यावरून तातडीने निर्णय घ्यावा यासाठी मनोज जरांगे पाटील हे ८ तारखेपासून आंतरवाली सराटीत उपोषण करणार होते. मात्र, आंतरवाली सराटी ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध करत त्यांना परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती केली होती.

यामुळे पोलिसांनी त्यांना उपोषण करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याची चर्चा सुरू असतांना आणखी दोन गावांनी त्यांची साथ सोडल्याने त्यांना धक्का बसला आहे.

मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार होते. मात्र, येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्या उपोषणास परवानगी नाकारावी अशी मागणी केली होती.

त्यानंतर पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करणार परवानगी नाकारली. आंतरवाली सराटीत नंतर आता जरांगे पाटील यांच्या उपोषणास आता आणखी दोन गावाने विरोध केला आहे. Manoj Jarange Patil

वडीगोद्री आणि दोडगाव येथील नागरिकांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी मिळू नये यासाठी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे. अंतरवलीसह वडीगोद्री आणि दोडगाव गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता या आंदोलनास परवानगी देण्यात येऊ नये असे म्हटले होते.

दरम्यान, या सोबतच जातीय सलोखा देखील बिघडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला होता. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या देखील आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!