Malaika Arora Father : मलायका अरोराच्या वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, इमारतीच्या छतावरुन उडी मारुन संपवलं जीवन…


Malaika Arora Father : बॉलिवूड इंडस्ट्रीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज (ता.११) सकाळी आत्महत्या केली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे. अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉ. भाभा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. Malaika Arora Father

मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आले नाही. मागील वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!