Maharashtra Politics : जिल्ह्यात ग्रामीण भागात भाजपचं अस्तित्व टिकणार काय? मंत्रीपदे शहरात मग ग्रामीण भागात निवडणुका जिंकायचा कश्या?


Maharashtra Politics उरुळीकांचन : विधानसभा निवडणूकीला एक महिन्याचा कालावधी उरकल्यानंतरही राज्य मंत्रिमंडळाचा खाते विस्तार व खातेवाटप होण्यास उशीर झाल्यानंतर महायुतीच्या या तिघाडी सरकारच्या महिन्याच्या सत्तास्थापनेच्या दाव्यासह कार्यपद्धतीवर महिन्यातच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. महायुतीला पूर्ण बहुमत मिळवूनही समांतर सरकार चालविण्यास अपयश आले आहे. मात्र या सर्व घडामोडीत राज्यात १ नंबरचा पक्ष असलेल्या भाजपला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला काय मिळाले म्हणून संशोधनाचा प्रश्न असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकमेव आमदार असलेल्या राहुल कुल यांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने महायुतीत जागावाटपात हद्दपार झालेला भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला कसा सावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचा सामावेश झाल्यानंतर २०१४ च्या नंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्तम स्थितीत असलेल्या भाजपला जिल्ह्यात घरघर लागण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात जागावाटपात मावळ व शिरुर हे हक्काचे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नेतृत्व कोन सावणार अशी चिंता भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पडू लागली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या महायुतीत येण्या- पूर्वी भाजपला प्रत्येक तालुक्यात आमदारकीच्या ताकदीचे नेतृत्व मिळाल्याची स्थिती होती. मात्र मागील दिड वर्षापूर्वी अजित पवार यांचा राष्ट्रवादी भाजपसोबत आल्याने अनेकांची संधी हुकली आहे. Maharashtra Politics

त्यातच आता नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले असून भाजप दहा वर्षात तिसऱ्यांदा सत्तेवर येऊन राज्यात १नंबरचा पक्ष बनला आहे. मात्र राज्यात ‘सबकुछ ‘ असलेला भाजप जिह्यात मात्र ‘सबकुछ साफ’ होण्याचा मार्गावर असून भाजपला जिल्ह्यात ग्रामीण भागातील नेतृत्वाची आशाच न राहिल्याने जिल्ह्यात भाजप मात्र पिछेहाट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात भाजपला राहुल कुल यांच्या रुपाने एकमेव संधी मिळाल्याने त्यांच्या मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र हॅटट्रीक पूर्ण होऊन कुल यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आल्याने जिल्ह्यात उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांना न्याय कोन देणार असा मोठा प्रश्न आहे.

जिल्ह्यात मागिल दिड वर्पापूर्वी राष्ट्रवादी सत्तेत येऊन भाजप पदाधिकाऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. निधीपासून ते जिल्हा प्रशासनात काम करताना ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे हाल झाले आहे. शहरातील वरिष्ठ नेते या ग्रामीण भागातील पक्ष संघटनेचे लक्ष देत नसून सत्तेची ताकद या पदाधिकाऱ्यांना देत नसल्याने कार्यकर्ते फक्त निष्ठावान म्हणून मिरवत आहे. मात्र दुसरीकडे सत्तेतील पदे व सत्तेचा लाभ राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते मिळवत असून जिल्ह्यात या संघटनेकडे तरुणांचा ओघ वाढणार आहे. परंतू सत्ता येऊन भाजपला मागील तीन वर्षात प्रशासनातील समितीत्यांवर पदाधिकारी नेमणूक करणे शहरीनेतृत्वाने डोळेझाक केल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती,बाजार समिती, कारखाने आदी निवडणूकांत यश मिळविणे भाजपसाठी दुरापास्त ठरणार आहे.

राष्ट्रवादी भाजपच्या बोकांडी?

राज्यात भाजपची निर्विवाद सत्ता येताना पुणे जिल्ह्यात भाजपला राष्ट्रवादीशी युती करून नेमका काय फायदा झाला असा सवाल भाजप कार्यकर्ते करत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काही जागांवर युती तोडून आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला मग मंत्रिमंडळातील ही संधी गेल्याने भाजपच्या बोकांडी राष्ट्रवादी बसून भाजपचा काय फायदा झाला ? ही मोठी सल कार्यकर्त्यांत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!