Maharashtra Politics : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, भेटीचे कारणही आलं समोर…

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. खरं तर उद्धव ठाकरे आज नागपूरला अधिवेशनानिमित्त दाखल झाले होते.
त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांनी फडणीवसांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत अनेक शिवसेनेचे नेते उपस्थित होते. विषेश म्हणजे या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही आहे. त्यामुळे भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाहीये. विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे. Maharashtra Politics
दुसरीकडे फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.