Maharashtra Politics : ठरलं! उद्या फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी, तयारीही झाली, नावांची आज घोषणा होण्याची शक्यता…

Maharashtra Politics : भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर आज महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून, तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. उद्या आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान मोदी यांचा हा मुंबई दौरा कमी कालावधीचा आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तर आझाद मैदानावर या शपथविधीची तयारी आता जवळपास पूर्ण होत आहे. या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे. Maharashtra Politics
उद्या आझाद मैदानावर केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे कार्यक्रमाचं स्वरूप संक्षिप्त करण्यात आलं आहे.
तर इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडणार आहे. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे.