महाराष्ट्राचा बिहारच झालाय!!! राज्यात आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने जबर मारहाण…


Crime News : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरुन राज्यात संतप्त प्रतिक्रिया अजूनही सुरु आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आक्रोश व्यक्त होत आहे.

अशातच आता पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुटाळा ग्रामपंचायतच्या सरपंचावर लोखंडी रॉडने हल्ला जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहे.

किरकोळ कारणावरुन हा हल्ला झाल्यामुळे राज्यात गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. हा प्रकार खामगाव तालुक्यातील एका हॉटेलमध्ये घडला.

सरपंच निलेश देशमुख आणि त्यांचे मित्र एका बारमध्ये जेवत असताना, आरोपीही बाजूच्या केबिनमध्ये बसले होते. यावेळी थुंकण्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला, जो हाणामारीत बदलला. या किरकोळ कारणावरून नंतर सरपंच देशमुख यांना रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली.

दरम्यान, या हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!