सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा! १०० रुपयांनी स्वस्त झाला एलपीजी सिलेंडर, जाणून घ्या नवीन दर..

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना एक गुड न्यूज दिली आहे. व्यवसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर तेल कंपन्यांनी कमी केले आहेत. त्यानुसार, व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ९९.७५ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळेच एकीकडे भाज्या, डाळींच्या महागाईचा फटका बसणाऱ्या सर्वसामान्यांना अप्रत्यक्षरित्या काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील गॅसचे दर
मुंबई – (११०२.५० घरगुती), (१६४०.५० व्यावसायिक)
ठाणे – (११०२.५०), (१६४०.५०)
नागपूर – (११५४.५०), (१८६४.५०)
पुणे – (११०६), (१७०१)
नाशिक – (११०६.५०), (१७१६)
छत्रपती संभाजीनगर – (११११.५०), (१७४५)
कोल्हापूर – (११०५.५०), (१६६०)
सातारा – (११०७.५०), (१७०८)
सोलापूर – (१११८.५०), (१७३२)
सिंधुदुर्ग – (१११७), (१६८७)
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (१४.२ किलो) दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्याच्या राजधानीत मुंबईत घरगुती गॅसचा दर ११०२.५० रुपये इतका आहे. या किंमतीत शेवटचा बदल १ मार्च २०२३ रोजी झाला होता.
दरम्यान, तीन वर्षात घरगुती गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या घरगुती गॅस सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेला आहे. तसेच यावरील सबसिडी देखील बंद झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.