कोल्हापूर हादरलं!! घाम गाळून घर उभ केलं अन् राहत्या घरानंच घेतला जीव…


कोल्हापूर : मुसळधार पावसाने राज्यात थैमान घातले आहे. तसेच अनेक ग्रामीण भागांमध्ये दरड कोसळून किंवा रस्त्याला भेगा पडल्याने गावांच्या संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी आपल्याने पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी जावं लागत आहे.

आजरा तालुक्यातील किणे गावात मुसळधार पावसाने दुर्घटना घडली आहे. पै पै जमा करुन जे घर उभे केले, भिंती सजवल्या त्याच घराने महिलेचा जीव घेतला आहे.

सुनीता अर्जुन गुडूळकर असे या महिलेचे नाव आहे .

किणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये सुनीता या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला.

या दुर्घटनेत त्यांच्यासोबत वत्सला परसु गुडुळकर देखील जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचे घडली आहे. गुडूळकर कुटुंबीय हे येथील प्राथमिक शाळेसमोरील घरामध्ये राहत होते. सुनीता या गोठ्यामध्ये गेल्या असताना अचानकपणे मातीची भिंत कोसळली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहत्या घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्देवी घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे, तर गुडूळकर कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!