Lawrence Bishnoi : मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर, जाणून घ्या..

Lawrence Bishnoi : गुन्हेगारीच्या जगतातील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मागच्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचं आढळून आले आहे. अलीकडेच झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईचा थेट संबंध आढळून आले आहे.

काही दिवसांपूर्वी सलमान खानला आलेली धमकी आणि त्यानंतर सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातही लॉरेन्स बिश्नोई गँगचाच थेट संबंध असल्याचं समोर आले होते. अशातच त्याला आता थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.
वांद्रे पूर्व विधानसभा मधून आमदार झिशान सिद्दीकी विरोधात लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला ऑफर आली आहे. उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे.

उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. बाबा सिद्दीकी देशभक्त नाही, लॉरेन्स बिश्नोई देशभक्त आहे. तर लॉरेन्स बिश्नोई हा उत्तर भारतीय समाजाचा आहे. Lawrence Bishnoi

बिश्नोईमध्ये आम्हाला शहीद भगत सिंग दिसतो. त्यामुळे निवडणूक लढवण्यासंदर्भात विचार करावा, अशी विनंती केली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेकडून गुजरात येथील साबरमती जेल प्रशासनाला निवेदन लिहून मागणी करण्यात आली आह. उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला पूर्ण पाठिंबा आहे. असे पक्षात म्हटले आहे.
दरम्यान, पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याची गँग आता महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे. त्याच्या गँगने सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची नुकतीच हत्या केली.
त्याच्या गँगकडून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला देखील वारंवार धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे हात धुवून लागला आहे. सध्या बिश्नोई गुजरातमधील साबरमती कारागृहात सर्वात सुरक्षीत अंडा सेलमध्ये कैद आहे.