पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून तरुणामध्ये नैराश्य वाढत आहे. यामुळे अनेक तरुण टोकाचे पाऊल उचलत आहेत. आता
MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, गेल्या काही काळात पेपरफुटीसह विविध गैरप्रकार होत असल्याने एक स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डावलल्याची भावना निर्माण होत असून यातूनच त्यांची वर्षानुवर्षे केवळ परीक्षा देण्यातच जातात.

त्यातच कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळं आईवडील मुलांना शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाहीत. अशा वेळी लाखो विद्यार्थी उधार-उसनवार करुन पुण्यासारख्या शहरात अभ्यास करतात पण परिस्थितीमुळं हे पैसे परत करता न आल्याने आर्थिक ताण वाढतो.

तसेच स्वाभिमानालाही ठेच लागते मग यातूनच ते आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांची तातडीने एमपीएससीतून हकालपट्टी करुन तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी यावेळी रोहित पवार यांनी केली आहे.

तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नाची राख केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबालाही भरीव आर्थिक मदत द्यावी, असेही आमदार रोहित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार पेपरफुटीवर आक्रमक भूमिका घेत असून सरकारने लक्ष देण्याची मागणी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!