Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची झाली मोठी अडचण, ‘या’ ६ गोष्टी असेल तर नाही मिळणार पैसे, जाणून घ्या..

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती, त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबाजावणी सुरू झाली.

आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हापते जमा झाले आहेत. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हापता अँडव्हास जमा करण्यात आला होता. म्हणजे ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाचवेळी तीन हजार रुपये जमा करण्यात आले. दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे महायुतीने या योजनेची घोषणा केली तेव्हापासून महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आली होती. Ladki Bahin Yojana

आता राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याने महिलांना २१०० रुपये कधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. याबाबत अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल, ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, त्याआधीच लाडकी बहीण योजनेची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. कारण या योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची सरकारकडून पुन्हा तपासणी केली जाणार आहे.या पुनर्तपासणीमध्ये किंवा फेरपडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र आढळतील, त्यांचे अर्ज रद्द केले जातील.
या लोकांना लाभ मिळणार नाही..
१) २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. मातर ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
२) ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
३) ज्या कुटुंबातील सदस्य शासकीय विभागात कायमस्वरूपी किंवा कंत्राटी तत्त्वावर नोकरी करतात अशा कुटुंबातील महिलांनाही हा लाभ मिळणार नाही. अशा कुटुंबातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज केल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.
४) ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत अशा कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
५) संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
६) ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील तर त्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.