बायांनो, कडक उन्हात स्वयंपाक करणं टाळा, जाणून घ्या महापालिकेच्या गाईडलाइन..


मुंबई : काही काळात तापमानाचा वार प्रचंड वाढणार असून त्यामुळे उष्माघाताचे प्रकार होऊ नयेत, नागिरकांना त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने उष्माघात नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी काही खास गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

मुंबईत जाणवत असलेल्या उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या काळात काय करावे? आणि काय करू नये याबाबतच्या थेट सूचना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नियमित करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे आणि सावध रहावे, उष्माघातापासून बचाव करावा असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

जाणून घ्या मुंबई महापालिकेच्या गाईडलाइन्स..

स्वयंपाकघरात हवा खेळती रहावी यासाठी दरवाजे, खिडक्या उघडे ठेवा.

मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे, कारण ते शरीराला हानी पोहोचवू शकतात.

कडक उन्हाच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा.

शिळे अन्न खाऊ नका.

सावध रहा, स्वत:ची काळजी घ्या.

दरम्यान उन्हाचा तडाखा वाढल्याने मातीचे माठ आणि राजणांच्या किमतीत वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने बाजारात गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किमती ५० ते १०० रुपयांनी वाढल्या आहेत. माठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या किमती वाढल्या असून वाहतूक खर्चही वाढला आहे.

त्यामुळे या गरिबांचा फ्रीज अर्थात माठांचे दर वाढले आहेत. यंदा एका मध्यम आकाराच्या माठाची किंमत २५० ते ३०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ग्रामीण भागातील आणि शहरातील नागरिक उन्हाच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी आणि पाणी गार ठेवण्यासाठी माठ आणि रांजणांची मागणी करत आहेत. या विक्रेत्यांच्या मते, उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!