९० दिवसांपासून फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? पोलिसांनी रात्रभर हुडकलं, अन्…


नाशिक : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठे खुलासे होताना दिसले. देशमुखांची हत्या किती जास्त क्रूरपणाने केली, हे व्हायरल होणाऱ्या फोटोतून पुढे आले. संतोश देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर कोठडीत आहेत. एसआयटी आणि सीआयडीकडून याप्रकरणातील तपास सुरू आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशकात असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. कृष्णा आंधळे ज्या गाडीवरून जात असल्याचा दावा करण्यात आला. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही पुढे आले.

मात्र. यामध्ये गाडीवरून जाणाऱ्याचा चेहरा आणि गाडीचा नंबर दोन्ही व्यवस्थित दिसत नव्हते. नाशिक पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू ठेवले. मात्र, अजूनही कृष्णा आंधळेबद्दल काहीच माहिती पुढे आली नाही. आठ दिवसांपूर्वी देखील नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा जोरदार रंगताना दिसली.

पोलिस अलर्ट मोडवर आहेत आणि त्याचा शोध घेत आहेत. कालपासून सर्च ऑपरेशन करूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाहीये. यामुळे कृष्णा आंधळे दिसल्याची फक्त आणि फक्त अफवाच असल्याचे आता सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!